STORYMIRROR

गोविंद ठोंबरे

Drama

2  

गोविंद ठोंबरे

Drama

मैत्री

मैत्री

1 min
14.1K


तुझं नातं जगावेगळं

हळवं आणि मन मोकळं

कधी कधी रागवावं

अन दुःखात गोड हसवावं


शाळेतली भेट तुझी

कॉलेज कट्ट्यापर्यंत गेली

नंतर नंतर दूरही गेलो

तरीही आठवण मनात राहीली


हरलो जिंकलो थाप मिळाली

तुझीच साथ कुठेही धावली

तुझ्याचसाठी तुझ्याच हाती

सुख दुःखांची गाठ सुटली


माझाच तू अन् तुझाच मी

प्रेमावेगळी जिंदगानी

कधी निसटली कधी गवसली

अशीच आपली मित्र कहाणी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Drama