मायमराठी
मायमराठी
'अमृताहूनी गोड व सरस'
अशी मायमराठीची महती
महाराष्ट्राची 'राज-ज्ञानभाषा'
म्हणून मराठीची ख्याती
मायमराठीत हिंदी व इंग्रजी
शब्दांची झालीय 'मिक्सिंग'
मराठी भाषा बुडवण्याकरता
चाललीय सर्वत्र 'फिक्सिंग'
आंतरराष्ट्रीय भाषा प्रभावामुळे
इंग्रजी शाळांची पत आहे
'तळ्यात न मळ्यात' अशी
मराठी शाळांची गत आहे.
महाराष्ट्रात मराठी-अमराठी
दररोज चिघळतोय वाद
'मला वाचवा' अशी आपणास
मायमराठी घालतेय साद
आपल्याच घरात परके म्हणून
जगण्याची आपणावर येऊ नये वेळ
महाराष्ट्रात मराठी भाषिक व
परप्रांतीयांची होऊ नये भेळ
मायमराठी संपलेली नाही अन्
संपणारही नाही हा धरावा आग्रह
मराठी भाषा-मन-संस्कृती
चिरडण्याचा टाळावा दुराग्रह
मराठी विकासाकरता असावेत
मराठी ग्रंथालये व विश्वकोश
मराठी व्याप्तीवर्धक बनवावे
अभ्यासक्रम व शब्दकोश
खाजगी-सरकारी कार्यालये,
बँकांत असावे मराठीचे महत्व
चॅनेल्स, कॉलसेंटर्स, बिझनेसमध्ये
असावे मराठीचेच अस्तित्व
मायमराठीने सातासमुद्र रोवलाय
आपल्या महाराष्ट्राचा 'झेंडा'
'मी मराठी' म्हणून मराठीत
बोलण्याचा असावा 'अजेंडा'
