STORYMIRROR

Prof. Dr.Sadhana Nikam

Inspirational

5.0  

Prof. Dr.Sadhana Nikam

Inspirational

मायबोली

मायबोली

1 min
899


रूप मनोहर लेऊन

शालू शालीनतेचा नेसून

सह्याद्रीच्या कडेकपारीत

साधुसंतांच्या पावनभूमीत

मायबोली नांदत आहे


शारदेच्या मंदिरात

मांगल्याच्या प्रतिमेत

स्वाभिमानाचा डंका मिरवत

मोठ्यांचा दुराभिमान घालवत

मायबोली नांदत आहे


कृष्णा गोदाच्या खांद्यावर

सातपुडयाच्या सानिध्यात

शब्दांच्या अलंकारात

कर्तुत्वाची शिखरे गाठत

मायबोली नांदत आहे


हृदयाशी नाळ जोडत

अंतकरणाला साद घालत

अंतरीचा जिव्हाळा जपत

मधुर वाणी सुखावत

मायबोली नांदत आहे


जखमा प्रांतवादाच्या झेलत

व्यथा मनात जपत

वैभवशाली परंपरेचे

सोनेरी स्वप्न रंगवत

मायबोली नांदत आहे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational