STORYMIRROR

Madhuri Dashpute

Inspirational

4  

Madhuri Dashpute

Inspirational

माय

माय

1 min
254

अंधाऱ्या रात्रीत भटकून

स्मशानाला जवळ केल

कितीतरी रात्रीच अन्न

स्मशानातल्या मढ्याने दिल!


जिवंत नव्हती माणुसकी

उभ्या तिच्या मर्दात

थंडीने कुडकूडली

अंधारात सारी रात!


काळजाचा तुकडा जेव्हा

होता तिच्या गर्भात

लाथाडली तेव्हाच दिला

जिवंतपणीच नरकवास!


खचली नाही तरीही

उभी राहिली ताठ

तिमीरातून तेजाची

शोधली अखेर वाट!


डगमगली नाही

चालत राहिली

पेलत सारी आव्हाने

उजळून टाकलं जग तिच्यातल्या प्रेमाने!


डोईवरचा पदर सावरीत

फिरली देशविदेश

राखली संस्कृतीची शान

बदलला नाही वेष!


विटेवरची रखुमाई

रावळातच सजते

सिंधुमाई तू मात्र

हृदयात साऱ्यांच्या बसते!


जनकल्याणा देह झिजवून

कीर्तिरूप झालीस

सकल जणांची माय म्हणुनी

मूर्तिमंत झालीस!


मूर्तिमंत, कीर्तिवंत

दयावंत जाहली

म्हणुनी कित्तेकांनी तिच्यासाठी

शब्दसूमनांजली वाहिली!


सकल साऱ्या विश्वाला माई

पोरक केलंस आज

हृदयात मात्र तेवत राहील

तुझ्या विचारांची वात

तुझ्या विचारांची वात!!!!!!!......


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational