माय
माय
शब्दाविना समजून घेते ती माय,
लेकराला स्वतःपेक्षा जास्त ओळखते ती माय.
तिच्या उदरात संभाळ करून,
ती स्वतः नवा जन्म घेते.
पावलोपावली त्याग करून...
लेकरास जीवापाड जपते.
देवा मला प्रश्न पडतो
ही शक्ती तू कुठून देतो ?
संभाळ करुनी लेकरांचा,
जीवन अर्पण करते.
हसत हसत लेकीला
सासरच्या हवाली करते.
कसं जमतं कोणास ठाऊक
मनावर दगड ठेवन.
समाजाच्या परंपरेसाठी
काळजाचा तुकडा दुर करणं
ममतेचा तू साठा,
प्रेमाचा तू सागर.
असच राहू दे युगानयूगे
तुझे प्रेम आम्हावर
