माय मराठी
माय मराठी
आवडते मज
मनापासुनी मराठी
जपते ठेवा मज
मायबोली मराठी
अभिमानाने गाते
गीत मराठीचे
साहित्यांनी भरले
संगीत मराठी चे
विसावले वास्तव्य
मज मराठीत
निर्भिड पणे दडले
माझ्या मराठीत
मधुरतेने भरली
वाणी मराठी
हळवी बोलवे
माझी मराठी
अमृताहुनी गोड
वाटे मज मराठी
पिता विषाचे घोट
गोड करे मराठी
आहोत तुझ पायी
माय माऊली मराठी
वसले मनामनांत
माय माऊली मराठी
