माय मराठी
माय मराठी
ममतेचे बोल ती
वात्सल्याची सावली
मायबोली आपली ती
माय मराठी माऊली
जन्मली ग्रंथ,पुराणातूनी
ज्ञानेश्वरी,वेदांतूनी झळकली
साहित्यातूनी मान मिळवला
'राजभाषा' म्हणून घोषिली
स्वरचिन्हांनी नटली ती
शब्दांलकाराने मढली
वारसाच संस्कृतीचा
संतांनी अंगिकारली
ज्ञान वेद-शास्ञांचे
पसायदान थोरची
अभंग ओव्या रचल्या किती
शानच और मराठीची
शिवरायांची गर्जना ती
दुमदुमली सह्याद्रीतूनी
हिंदवी स्वराज्य स्थापले
मावळ्यांना स्फूर्ती देऊनी
धन्य महाराष्ट्राची भूमी
लाभली तिला मराठी
जाती-पाती ना गंध
सर्वांच्या ती ओठी
कुसुमाग्रजांचा जन्मदिन
उत्साहात साजरा करुया
अभिमान मराठीचा बाळगूनी
शान तिची राखूया