माऊची बाळं
माऊची बाळं
मनीमाऊची दोन बाळं
एक गोर एक काळ,
गोर आहे गोरुल
काळ आहे काळूल.
इवले इवले कान
इवली इवली मान,
इवली इवली शेपूट
डोळे किती छान.
टुकू टुकू बघत
आई ला शोधत,
इथे तिथे फिरत
मॅव मॅव करत.
दूध पिती मटामटा
भात खाती चटाचटा,
थोडा जरी आवाज देता
येती धावत पटापटा.
मऊ मऊ अशी
जशी कापसाची उशी,
हळू हळू चालत
हलवतात मिशी.
रात्रीच्या अंधारी
घाबरून जाते स्वारी,
बसती गोधडीत लपून
जाती गुडूप झोपून.
