मातृभाषा मराठी
मातृभाषा मराठी
"माय मराठी" ही लई भारी, हो अमुची
माय मराठी ही लई भारी...||
जोडाक्षर अन् व्याकरणाच्या ठेक्यावरी,
लयबद्ध शब्दसुमनांनी रंग भरी बोलीभाषेपरी,
असे लावणी,भारुड, अभंग, ज्ञानेश्वरी, हो अमुची
माय मराठी ही लई भारी...||
पारंपरिक खेडेगावी बोल तिचे बोले,
मराठी सणांमध्ये तिचा रंग हा चाले,
नटवूनी हिला नानापरी, हो अमुची
माय मराठी ही लई भारी...||
मराठी जन नाट्य, नमन सादर करती,
मानून हिला रूप देवी सरस्वती,
कवी - लेखक असती आमचे भारी, हो अमुची
माय मराठी ही लई भारी...||
इंग्लिशमुळे बिघडत चाललय हिच अंग,
मराठी भाषिकांमुळेच चढतोय तिला रंग,
छत्रपती शिवरायांच्या या भूमीवरी, हो अमुची
माय मराठी ही लई भारी...||
