माती 'मोल'
माती 'मोल'
तप्त मातीचा गंध वेगळा!
तप्त मातीचा रंग वेगळा!
तप्त मातीचा छंद वेगळा!
तप्त मातीचा कंद वेगळा!
ओल्या मातीचा गंध वेगळा!
ओल्या मातीचा रंग वेगळा!
ओल्या मातीचा छंद वेगळा!
ओल्या मातीचा कंद वेगळा!
निसर्गाने नटलेल्या झाडा फुलाला
भक्कम पाया ओल्या मातीचा!
तसाच लागतो
भक्कम पाया तप्त मातीचा!!!
साधता तोल तप्ततेचा , ओल्यामातीचा!
घडवतो कुंभार नवनव भांड्यांचा!
कलाकुसरीच्या अनेकानेक वस्तुंचा!
जीवन फुलते जमिनीवर
निसर्ग़ात विलीन होते त्या मातीतच!
माती 'मोल' कळले त्यांना
त्यांनाच कळले जीवन सार!
