मास्तर
मास्तर
लाज वाटते मास्तर
तुम्हाला मास्तर म्हणतांना
वाटलं नव्हतं तुमच्यातही
सैतान बसला आहे
नीती अनिती, आदर्श
तुम्हीच सारे सांगितले
आदर्शाचा ठसा आज
तुम्हीच पुसला आहे
'साने' गुरुजींच्या कथा
तुम्हीच सांगितल्या होत्या
'गुरुजी' नावाला काळिमा
तुम्हीच फासला आहे
केवळ तुमच्या वरतीच
भरवसा उरलेला होता
गेला तडा आज त्याला
वर्मी घाव बसला आहे
नका सांगू नीती अनीती
नका सांगू आदर्शही
तुम्ही तरी काय करणार?
सारा समाजच नासला आहे
