मानुसकीने रहा
मानुसकीने रहा
काय लिहावं आता, मिळाला परमानंद सारा
मध्येच माशी शिकली, तसा चढला सूर्याचा पारा
कोन ती लोक जी, आपल्याला नाव ठेवतात
स्वतः पाहिजे तसे पाहिजे तेव्हा, मना सारखं वागतात
आमचा तो गुन्हा, आणी त्यांची ती चूक
पेटलेलं रान पहायला, बघ्यानचिं गर्दी खुप
बर त्यांच महत्व नाही, आयुष्यात असं खास
तरीही वेळ घेतात आपला, जसा फुकटचा घास
लांब रहावे अश्यान पासून, नसतात हे कोनाचे
विकली ज्यांनी नाती, ते पुरावे देतात देवाचे
तूज सम तु म्हणुनी सोडावे, बाकी आपले पहा
थोडसं अंतर ठेऊन, फक्त माणुसकीने रहा
