STORYMIRROR

Mrudula Raje

Inspirational

3  

Mrudula Raje

Inspirational

माणुसकीची शाई

माणुसकीची शाई

1 min
694

माणुसकीच्या शाईने आत्म्याच्या कागदावर लिहिली मी कविता।

पण मुर्दाडांच्या ह्या जगात आहे का कोणाला वेळ आत्मा वाचण्याकरता?॥


भावनांची शाई डोळ्यातून ओघळते ; आणि पुसली जातात अक्षरे ,आत्म्याच्या कागदावरची।

पण निर्ढावलेल्या मनाला कुठे फुटतो पाझर आणि कुठून होतील डोळे ओले , देताना साथ सुख-दु:खाची?॥


थिजलेल्या, गारठलेल्या, मनाला कशी कळणार रक्ताळलेली मने?।

कशी उमजतील त्यांना, आत्म्याच्या कागदावरची अव्यक्त कोरी पाने?॥


वाट पाहतो मी, अचानक येईल कधी, कोणी प्रवासी।

माणूसकीची शाई वापरून लिहीन म्हणेल तो कविता अविनाशी॥   


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational