माणुसकीचा झरा
माणुसकीचा झरा
माणुसकीचा झरा वाहे
सुखी माझ्या परिवारात
प्रत्येक व्यक्तीस मान मिळे
घरातील संसारी जीवनात
पाहुणे येतात माझ्या घरी
आनंद मिळतो या जीवनी
जेवण वाढवूनी पाहुण्यांना
भुकेची तृप्तता मी भागवी
आशीर्वाद मिळे लाखमोलाचा
जीवनात मी सुखाने जगली
आनंद सदैव देऊन इतरांना
खरी देवाची भक्त झाली
सार्थक झाले जीवन माझे
देवाच्या इच्छेप्रमाणे जगले
खूप काही करायचं आहे
मनी स्वप्न अनेक धरले
माणुसकीचा झरा दिसे
माझ्या रोजच्या कर्मातूनी
मन आहे माझे खूप सुंदर
जीवन वाटे मला स्वर्गवाणी
