आई
आई
आई होऊनी ती बापही झाली
घरातील काम करुनी बाहेर ही ती काम करी
दिवसभर कष्ट करत राही माझी आई
त्यागाची ती मूर्ती आहे अनमोल भारी
काम करुनी खूप थकून ती जाई
स्वतःच्या जीवनाची परवा कधीच तिला नाही
अंग दुखत असेल तरीही ती स्वयंपाक करी
दुःख असतानाही जीवनी हसू गालावर तिच्या राही
मनातुनी ती खूप रडते जीवनात संघर्ष करते
अश्रू लपवूनी डोळ्यातील आनंद देते इतरांना
आईसारखे प्रेम नाही या जगात कोठे
सुखी ठेवा आईला विनंती करते सर्वांना
कष्ट करूनही लहानाचे मोठे बनवते लेकरांना
उपाशी राहूनी ती घास भरवते साऱ्यांना
सुन येऊनी पण राबते ती मुलांसाठी आजही
तिचा जीव जाण्याची वृत्ती नाही काहींना
आयुष्याला पुरत नाही कोणाची आई
सत्याचा स्वीकार करून जपा तिला प्रत्येकांनी
स्वतःच्या मुलांप्रमाणे जपा आईस
सुंदर हृदयात तिला स्थान द्यावे सर्वांनी
