सांजवेळी
सांजवेळी
1 min
319
रोज होते ही सांजवेळ
दिवस जाई हसूनखेळून
चहा पिऊन सांजवेळी
थकवा जातो मग पळून
साफसफाई करूनी सारे
स्वयंपाकाची होते तयारी
स्वादिष्ट अन्न करी नारी
तिच्या हाताची चव भारी
सांजवेळी दिवा लावूनी
घरात स्त्री प्रसन्नता ठेवी
आपलेपणा दिसतो घरात
तीची थोडी मनधरणी करावी
आनंदीत राहूनी ती जगी
कुटुंबात देई प्रेमाची सावली
सांजवेळी सुंदर परिवारात
धावा घेईल लक्ष्मी माऊली
जीवन कसे जगावे जगी
हे या परिवारातून कळावे
आपण पण या सांजवेळी
अनमोल असे क्षण जगावे
