STORYMIRROR

Amrapali Dhende

Action

4  

Amrapali Dhende

Action

माझी रमाई

माझी रमाई

1 min
851

त्याग केला जीवनी

ती रमाई आई माझी

दुःख सोसले जीवनी

कुटुंबाची वाहिली ओझी


चटणी भाकरी खाऊनी

समाधान मानत राहिली

अशी त्यागाची ती मूर्ती

माझ्यासाठी देवी झाली


किती गाऊ तिचे गुणगाणं

माझ्या नजरेत माझी माऊली

उपाशीपोटी राहून ग आई

तू भीमास मदतीस धावली


तुझी पण जयंती असावी

अशी मनोमन इच्छा धरली

पाहुनी जयंती होईल ग हर्ष

आम्रपाली त्यावेळी धन्य झाली


मोलमजुरी करून रमाई आई

शिक्षणासाठी भीमास पैसे पाठवी

मुलांचे पालन-पोषण करुनी

जीवनी त्यागाचा दिवा लावी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Action