तुला पाहता
तुला पाहता
मन तुझ्या भेटीस व्याकुळ होते
नजरेसमोर तुझे प्रतिबिंब दिसे
असे वेड लागले मला साजना
माझ्या हृदयात फक्त तूच असे
तुला पाहता हर्ष होई मनास
भाग्यवान झाले मी या जगात
किती करू प्रेम तुझ्यावर सख्या
गोड आठवण येते नित्य मनात
जिवापाड प्रेम करते तुझ्यावर
तसेच प्रेम तुझे हि असू दे माझ्यावर
तुझ्या माझ्या प्रीतीची रेशीमगाठ
जपणार मी सुखाने आयुष्यभर
तुझ्या शिवाय जीवन व्यर्थ वाटे
तुझ्यामुळे जीवनाला अर्थ असे
क्षणभर सुद्धा दुखवू नको मनाला
जीवनात तुझ्याशिवाय मला कोणी नसे
आयुष्याचा जोडीदार फक्त तूच
हृदयात धडधडणारं काळीज तू
श्वासाश्वासात माझ्या असे तू
माझे जीवन सार्थक करणारा तू

