STORYMIRROR

Amrapali Dhende

Classics

3  

Amrapali Dhende

Classics

आई अम्बे

आई अम्बे

1 min
405

आई अम्बे जगदंबे

साद घालते मी तुला

पाव माते तू ग आता

संकट आले जगाला


मानव कठोर झाला

बुद्धीचा नाश पावला

किती वाईट बनला

तो जगी दुःखी झाला


वाईट कर्माची देऊनी शिक्षा

चांगल्यांचे कर कल्याण

तुझे गुणगान गाऊनी आंबे

प्रसन्न होईल हे भक्तिमय मन


तुझे अस्तित्व कळू दे

मन मानवाचे घाबरू दे

विलंब नको लावू आता

मानवी कर्माचे फळ दे


धाव पाव आई अम्बे

न्याय दे आज मला

चांगले कर्म करुनी

मानव दुखी का झाला


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics