फुलली गुलाब कळी
फुलली गुलाब कळी
1 min
442
आवडे मला गुलाबकळी
सुगंध अंगणी देत राही
परिसर दिसे खूप सुंदर
प्रसन्नता वाटे मनासही
मनात येत राही ग सखी
आणावे गुलाबाची रोपटी
वेगवेगळे त्याचे असे रंग
फुले असतात मोठी छोटी
जाऊया आपण नर्सरीत
अनेक रोप घेऊया विकत
निघा राखू त्या झाडाची
रोज टाकूया त्यांना खत
पाहुनी त्याला वाटेल सखी
फुलली पहा गुलाबाची कळी
सुंदर सुंदर दिसे नजरेस हा
एकत्र गुंफलेली छान पाकळी
