माणुसकी
माणुसकी


माणुसकी हाच आहे
माणसामधील गुण
बुद्धी दिलीय देवाने
वागे माणूस जाणून (1)
भुकेल्याला अन्न द्यावे
तृषार्ताला द्यावे पाणी
दुवा देतो तात्काळचि
सुखी होऊ दे म्हणूनी (2)
कडाडत्या थंडीमध्ये
झोपे अंग आखडून
अंगावर पांघरुण
टाकी दयाळू येऊन (3)
पूर, प्रलय, वादळे
नैसर्गिक संकटेच
दान देती दानशूर
मानवता धर्मानेच (4)
घासातला घास द्यावा
सांगे आपली संस्कृती
निरपेक्ष मन ठेवा
सर्वकाळ सर्वांसाठी (5)