माझ्यातला तो
माझ्यातला तो
त्याच्यावर मी मनापासून प्रेम केले
त्याच्या पुढे मला काहीच दिसेनासे झाले
त्याच्यातच मी अखंड वाहत गेले
त्यानेही मला पूर्णपणे गुरफटले
त्याच्यासाठी मी सगळ्यांना सोडले
त्याला मात्र मनात जीवापाड जपले
त्याच्यामुळे साऱ्याचा पडला मला विसर
त्याच्यापुढे सारे काही दिसू लागले धूसर
मी स्वतःच जणू त्याच्या स्वाधीन झाले
तो आहे ना सोबतीला मग,
जिंकेल सारे जग असे मला वाटले
पण मधेच फिस्कटला सारा डाव
काळजावर जेव्हा झाला घाव
तेव्हा मात्र मी एकाकी पडले
नव्हते कोणीच सोबतीला कारण
त्याच्यासाठी मी सार्यांना होते सोडले
तेव्हा झाली जाणीव चुकीचं मी वागले
निर्थक त्याला मनी मी बाळगले
माझी चूक तेव्हा आली मला कळून
त्याच दिवशी त्याला दिले मी सोडून
तेव्हा मात्र माझे मला सारे परत मिळाले
कारण त्याला सोडून मी माझ्या माणसात आले
म्हणूनच सांगते कधी आधीन त्याच्या होऊ नका
स्वतःच्या मनावर जरा लगाम ठोका
ज्यादिवशी मनातून त्याला कराल दूर
त्यादिवशी तुम्ही माणूस म्हणून व्हाल मशहूर
( टीप : इथे तो म्हणजे अहंकार , गर्व , मीपणा असा आहे , कोणी प्रियकर नाही )
