Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Dhananjay Deshmukh

Abstract Inspirational Others

3  

Dhananjay Deshmukh

Abstract Inspirational Others

माझ्यात मी ना उरलो...

माझ्यात मी ना उरलो...

1 min
180


मावळतीचा तो भास्कर

जाताना मज काही सांगून गेला

माझ्यात मी न उरलो आज

उजेड माझ्यातला हरवुन चालला...


घेतला नभाने मिठीत चंद्र

अलगद ओढले कवेत चांदणीला

पाखरे निघाली घरट्याकडे

गुरे ढोरे आली गोठ्यात बांधणीला...


मावळतीचा तो भास्कर

पोटात सागराच्या निजावया गेला

देऊन अंधार जगास सार्‍या

पायथ्याशी डोंगराच्या आडवा झाला...


सजले निळे आकाश काळे 

चमचमणार्‍या त्या शुभ्र तारकांनी 

सांडला दारी सडा फुलांनी

पारिजातकाच्या त्या कुंद कळ्यांनी...


जो तो इथला बोलून गेला

माझ्यात मी न उरलो बघा आज

जाता जाता देऊन गेला

वसुंधरेला या प्रफुल्लित साज... 


Rate this content
Log in