STORYMIRROR

Sushama Gangulwar

Action

3  

Sushama Gangulwar

Action

माझ्या बापाला रिटायरमेंट नाही का ?

माझ्या बापाला रिटायरमेंट नाही का ?

1 min
211

दिवसरात्र राबतो तो रानांत,तो माणूस नाही का?

अरे सांगा रे,माझ्या बापाला रिटायरमेंट नाही का?

सुटाबुटातील राहणं मागत नाही तो कुणाला

फाटक्याच कपड्यांनी झाकतो तो तणाला

दिवसरात्र राबतो तो रानात,तो माणूस नाही का?

अरे सांगा रे,माझ्या बापाला रिटायरमेंट नाही का?

पंच पक्वान्न जेवणाची नाही रे त्याला आस

कांदा अन् भाकरी वर चालते माझ्या बापाचं श्वास

दिवसरात्र राबतो तो रानात,तो माणूस नाही का?

अरे सांगा रे,माझ्या बापाला रिटायरमेंट नाही का?

काटया कुट्यातून चालतो तो अनवाण्या पायी

त्याला पण विश्रांती हवी असं कुणालाच का वाटतं नाही 

दिवसरात्र राबतो तो रानात,तो माणूस नाही का?

अरे सांगा रे,माझ्या बापाला रिटायरमेंट नाही का?

स्वतःच्या खांद्यावर पेलतो मुलांच्या भविष्याचा भार

मरेपर्यंत काम करणे हाच का त्याच्या आयुष्याचा सार

दिवसरात्र राबतो तो रानात,तो माणूस नाही का?

अरे सांगा रे,माझ्या बापाला रिटायरमेंट नाही का?

पावसात भिजतो,उन्हात भाजतो,हिवाळ्यात कुडकुडतो

काळ्या आईच्या गर्भात थकून असाच पडतो

दिवसरात्र राबतो तो रानात,तो माणूस नाही का?

अरे सांगा रे,माझ्या बापाला रिटायरमेंट नाही का?

सरकारी कामगाराला साठ वर्षाची अट

माझ्याच बापाला का जन्मभर कष्ट करण्याची सूट 

दिवसरात्र राबतो तो रानात,तो माणूस नाही का?

अरे सांगा रे,माझ्या बापाला रिटायरमेंट नाही का?

आयुष्यभर जगत राहतो तो इतरांसाठी

तुम्हीच सांगा कधी जगावं तो बाप स्वतःसाठी

दिवसरात्र राबतो तो रानात,तो माणूस नाही का?

अरे सांगा रे,माझ्या बापाला रिटायरमेंट नाही का?

त्याच्याही वयाची असू द्या रे कुणालातरी भान

तो ही एक माणूसच आहे ठेवा या गोष्टीची जाण

दिवसरात्र राबतो तो रानात,तो माणूस नाही का?

अरे सांगा रे माझ्या बापाला रिटायरमेंट नाही का?

Rate this content
Log in

Similar marathi poem from Action