माझं मन
माझं मन
अबोल हळवे मन हे माझे उडू उडू झालंय आतुर,
कसे दावू उलगडूनी मी ग झालय किती प्रेमातुर!
तिच्या माझ्यातील हाच दुरावा लवकर मिटू देना,
प्रणयातुर मिलनाची गोडी मजला चाखू देना !!
अबोल हळवे मन हे माझे.......
अबोल प्रीतीची साथ अन मैत्रीचा विश्वास,
वचनाच्या त्या आणाभाका तिजसाठीच ग खास,
युगे युगे चालत राहो ग आपल्या प्रेमाचे स्वर,
अशी घडावी जादू न्यारी या सुंदर धरणीवर !!
अबोल हळवे मन हे माझे उडू उडू झालय आतुर.....

