माझं माहेर माहेर
माझं माहेर माहेर
*माझं माहेर माहेर,*
*काय सांगू किती दूर,*
*येता आठवण सखी,*
*दाटे आसवांचे पूर.*
*बालपण अवखळ,*
*होते जगले आनंदी,*
*जणू पाखरू आकाशी,*
*घेई भरारी स्वच्छंदी.*
*माझ्या माहेरची बाई,*
*किती सांगावी कौतुके,*
*आई-बाबा,ताई दादा,*
*मनी आठवांचे धुके.*
*माहेरच्या अंगणात,*
*होते गोकुळ सजत,*
*संगे सख्यांच्या आनंदे,*
*मुक्तपणे हुंदडत.*
*नारी जन्माची कहाणी,*
*माहेरच्या आठवणी,*
*घेऊनिया संगतीला,*
*जाई साजन अंगणी.*
💠💠💠💠💠💠💠
