STORYMIRROR

Sneha Kale

Tragedy

4  

Sneha Kale

Tragedy

माझं दुःख

माझं दुःख

1 min
263

माझे पाणावलेले डोळे

माझा उदास चेहरा

काहीच सांगत नाही का रे तुला


माझ्या हसऱ्या चेहऱ्यामागे दडलेलं 

माझ्या अंतरीतल दुःख

कधीच कळत नाही का रे तुला


माझ्या चिरडल्या गेलेल्या अपेक्षा

माझ्या दुखावलेल्या भावना

कधीच समजत नाही का रे तुला


माझं शुन्यात बघणं 

कोणाशी शब्द न बोलणं

काहीच खुणावत नाही का रे तुला


माझं कोमेजलेलं मन

माझे भकास डोळे

काहीच खुणावत नाही का रे तुला


भावनाविरहीत माझं थंड शरीर

जवळ घेतल्यावर

काहीच जाणवत नाही का रे तुला


तुझ्या प्रेमाने काठोकाठ भरलेलं माझं मन

एकाएकी कोरड्या विहिरीसारख झालंय

नाही जाणवत का रे तुला


घराच्या चार भितींमध्ये 

माझा आक्रोश 

नाही ऐकू येत का रे तुला


का झाली माझी अशी अवस्था

असा प्रश्न नाही सतावत का रे तुला



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy