माझी मर्जी!
माझी मर्जी!
1 min
181
मी तुझी कविता कधीच वाचत नाही.
कारण तु काय लिहीतोस हे मला समजत नाही.
तेच ते चंद्रतारे, त्याच त्या गोष्टी
इतकी युगे लोटली, तरी नाही प्रगती.
काही झाल तरी, मी आता ठरवलं
तुझ ऐकायचं नाही, तू मला रडवलयं
कानात आपल्या बोळे (कापसाचे) घालून
गप्प बसीन कशी.
तु तुझ्या राशी, मी माझ्या राशी.
इतक सारं ऐकून गप्प बसलास कसा?
काहीतरी बोल ना, रागवं जरासा?
आणि विचार मला, तुझी का इतराजी?
मी म्हणेन मग, जरा ठेव मर्जी माझी!