माझी माय
माझी माय
माय, हे फक्त कवितेत असतं
शब्दांची चौकट बनून
मोहरक्या शब्दांची बंदीशाही
नाकारू शकतो का खऱ्या अर्थाला
विसरू शकतो का कर्तव्याला
वाटेवरील ठसे पुसून जातील
खूप वाटेकरी निघून जातील
विखुरलेल्या ह्या शब्दाचे ठसे
त्या वाटेवर उमटतील
तिथेच उभा राहून
खोटे नाटे रेखाटीन
समुद्र तुझ्या पायाशी लोळवीन
नदीला तुझ्या पदराआड लपवीन
ऊन्हात अवकाळ पाऊस पाडून
भरतीच्या पुरासाखे शब्द लिहून काढीन
काहीही लिहिन
तू त्याहूनही जास्त असशील
माय फक्त कवितेत नसतं
ते दैवत मनात घर करत
