Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Punyashil Wankhade

Inspirational

5.0  

Punyashil Wankhade

Inspirational

माझी माऊली

माझी माऊली

1 min
10.2K


या माऊलीसाठी काय लिहू

शब्द मिळत नाही मला कोठे ।

या माऊलीवर लिहिण्याइतपत

नाही माझे व्यक्तिमत्त्व मोठे ।।


हिच ती माऊली

जिने मला हसणे शिकवले ।

जेव्हा जेव्हा मी संकटात सापडलो

हिनेच माझे अश्रू पुसले ।।


वाईट काम केल्यावर

हिनेच माझा रस्ता सुधारला ।

माझ्या भुकेसाठी हिने

स्वतःच्या तोंडातील घास माझ्या तोंडात घातला ।।


दुसऱ्याचे दुःख ही माऊली

स्वतःच घेऊन चालते ।

स्वतःचे दुःख मात्र

स्वतःच पचवते ।।


नाही तिला मोह कसला

नाही गर्व कसला ।

हवा असतो तिला फक्त

दोन गोड शब्दांचा बोलबाला ।।


हिच्यामुळेच आज मला

जीवन जगण्याची रित कळली ।

साधी भोळी माझी ही माऊली

दुसऱ्यांच्याच सुखात नेहमी रमलेली ।।


कठीण आहे आजच्या युगात

अशी माऊली मिळणं ।

जिने आजवर केलेत

नेहमीच सत्कर्म ।।


धन्य झालो मी आज

मला अशी माऊली लाभली ।

जिने या कलियुगात सुद्धा

माणुसकीची लाज राखली ।।


या माऊलीमुळेच आज मला

पुन्हा जगावसं वाटतं।

हिच्यामुळेच मला

सत्कर्म करावस वाटतं ।।


नेहमी या माऊलीचा

आशीर्वाद मला आहे ।

सुखी राहो माऊली माझी

हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे ।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational