STORYMIRROR

PRAMILA SARANKAR

Inspirational

5.0  

PRAMILA SARANKAR

Inspirational

माझी चिमणी पाखरं

माझी चिमणी पाखरं

1 min
2.3K



आज का मन गहिवरते?

का असे उदास वाटते?

शब्दही थांबले ओठात

मन का कातर कातर होते? ...


दोन वर्षाचा सहवास

केली मजा खूप

अभ्यास आणि उपक्रमातून

उलगडले प्रत्येकाचेच रुप....


प्रत्येकाच्या तऱ्हा वेगवेगळ्या

भाव त्यांचे निराळे

स्पर्शूनी गेले मनाला

गुण त्यांचे आगळेवेगळे....


यश म्हणजे उमदा कलाकार

अभ्यासाबरोबर सर्व कलेत आहे हुशार

सुरज आमचा चित्रकार

त्याच्या हातून घडू दे

नवनवीन अविष्कार....


गाण्याची आवड आहे

आदित्यला भारी

हबीब च्या जोक्सवर

मुले हसतात सारी....


दुर्गेश अभ्यासात

नेहमी असतो नंबर वन

ऋतुराजचं मात्र

खेळण्यातच रमतं मन...


अभ्यासाबरोबर मस्ती

दर्शनचा आहे हा फन्डा

यश बिरादर तोंडीत पटाईत

पण लिखाणात आहे थोडा थंडा.....


सांगितलेले काम करण्यास

दिपक असतो तत्पर

आर्यन बसतो नेहमीच

अपूर्ण वही पूर्ण करत....


सोहम, निखिल, साहिलची

वर्गसफाईसाठी लागते चुरस

महादेवची कोडी

असतात नेहमीच सरस....


भावेश आणि वेद

स्वभावाने दिसतात कुल

पण चिडल्यावर करतात

सर्वांचीच बत्ती गुल....


रोशनी, श्रेया, नम्रताला

नृत्याची आवड भारी

बोलणं कमी, अभ्यास आधी

अशी आमची सृष्टी आणि कोमल न्यारी....


गौरी, ऋतुजा, मयुरी

कामात आहेत पटाईत

पण चुका करतात

घाई घाईत.....


शांत आणि सुस्वभावी

अशी आहे श्रावणी

ओरडल्यावर वैष्णवीच्या (गोरुले) डोळ्यात येते पाणी...


गोष्टींची पुस्तके वाचण्याचा

छंद आहे श्रेया(वाघ) आणि वैष्णवीला(शेडगे)

अदिती आणि श्रेयाला(धावडे)

आवडतात दोरीउड्या मारायला....


अशी ही माझी मुलं

आहेत हरहुन्नरी

चौथी / अ चा वर्ग

शाळेत आहे लय भारी....


नाही नाते रक्ताचे

तरी मन गुंतून जाते

गुरु-शिष्याच्या अशा नात्याने

जीवन माझे फुलून येते.....


आयुष्याचं कोर पान

क्षणात रंगवून जातात

चिमुरडी ही पाखरे

मोठी झाल्यावर आपसूकच उडून जातात.....


आम्ही भेटायला येणार

देतात आश्वासन भरभर

आठवणीने यांच्या

दाटेल मग मनी हुरहुर.....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational