माझे वडील
माझे वडील
आईला तर सर्व पुजतात पण बाबांनाही तितकच महत्त्व असत
आई रडून दाखवते पण बाबांना भक्कम उभे रहाव लागत
आईची माया अपरंपार असते पण बाबांनाही तोड नसतो
बोलुन दाखवते आई पण बाबा प्रत्येक क्षण जगत असतो
आई बाबांच्या प्रेमाला कोणाचाच तोड नसतो
पण मुलीना सर्वात जवळचा तिचा बाबाच असतो
आंनद झाला तर हसतो बाबा पण दुख मात्र दाखवत नाही
कोणी घाबरु नये म्हणून बाबा हिम्मत कधी हारत नाही
छोटी ठेच लागताच आई सर्वाना आठवते
मोठ्या जखमेवर फुंकर मरायला बाबाच लागतो
बाबांच्या हिम्मतीवर घर उभ असत
जर नसेल बाबा कधी तर करमतही नसत
बाबा आहे घरचा एक भक्कम खांब
त्याच्याशिवाय जगणे विचारही लांब
बाबामुळे घराला शोभा मिळते
बाबांमुळे जिंदगी सर्वाची बहरते
I love you बाबा
