माझां महाराष्ट्र
माझां महाराष्ट्र
महादेशाला प्रकृतेचे मिळाले वरदान,
साधु-संत, महात्मा, ऋषिमुनिचे भूमिला दान.
युगपुरुषांच्या आगमनाने वाढली तीची शान,
त्यांच्या कर्तृवाचे महाराष्ट्रावर आहे ऋण.
मावळ्यांनी परतफेड करावे मातीचे ऋण,
देशासाठी त्यांनी करावे सर्वस्व अर्पण.
लष्करात आहे मराठा रिजिंमेंट्ची शान,
देशासाठी देतात ते आपले मौल्यवान प्राण.
महाराष्ट्राचे नेतृत्व विकासाठी गतिमान,
देशात त्यांचे म्हणुन अव्वल स्थान.
संकटाच्या काळात धैर्याचे उत्कृष्ठ प्रदर्शन,
देशाला दिशा, धैर्य देण्याचे कार्य महान.
ज्ञानेश्र्वर, नामदेव,एकनाथ,गाडगे संताची खान,
तुकाराम,चोखामेळा, बहिनाबाईचे सामाजिक शिक्षण.
जिजाऊ ,शाहाजी, शिवाजी ,संभाजीचे स्वराज्यस्वप्न,
समृध्द समतावादी महादेशासाठी अफाट योगदान.
साहित्य, कल,किडा,विज्ञान व तंत्रज्ञान,
यात महाराष्ट्राने मिळवले अग्रणी स्थान.
दिक्षाभूमि करते बुध्दविचारांचे मंथन,
सनातन धर्माचे हेच आहे चिंतनसथान.
अंधश्रध्दने देशात सर्वत्र घातले होते थैमान,
दाभोलकरांनी उचलला विडा अंधश्रध्दा निर्मुलन.
सर्वत्र महारोगाचे पसरले होते थैमान,
बाबा आमटे यांचे रुग़्ण्साठी आनंदवन.
जागा केला त्यांचा स्वाभिमान,
उपचाराने वाचविले त्यांचे प्राण.
त्यानींच पिकवले ,फळ-भाजी,अन्न-धान्य,
स्वावलंबी झाले कृषिउत्पाद बाजारात विकुन.
दुर्ग, गडकिल्ले,लेनी ऐतिहासिक स्थान,
महादेशात अनेक पर्यटक स्थान विलक्षण.
ज्योतिरलिंगांचे घ्यावे भकतांनी भरपुर दर्शन,
पाडुरंग,शिर्डीसाई सोबतच सेगांव गजाणन.
राष्ट्र संत तुकडोजीचे अचूक मार्गदर्शन,
जनहितासाठी सहकारिता जन-आंदोलन.
ज्योति-सावित्री, साहू,आंबेडकरांचे स्वप्न,
पंजाब,पाटिल, गाडगे शिक्षण संस्थान.
देशाची आर्थीक राजधानी मुंबईचे स्थान,
देशात औद्योगिकरणाचे सर्वत्र वातावरण.
नागरिकांच्या स्वास्थ सेवेसाठी प्रयोजन,
ग्रामवास्यांसाठी रुग्न वाहिनींचे प्रावधान.
