STORYMIRROR

Arun V Deshpande

Inspirational

4  

Arun V Deshpande

Inspirational

माझा तिरंगा प्यारा

माझा तिरंगा प्यारा

1 min
30.7K


कसा उंच फडकत राही

माझा तिरंगा प्यारा ।।


तीन रंगाची जादू हो न्यारी

मधोमध अशोकचक्र हे भारी

सदा नजरेसमोर राही

माझा तिरंगा प्यारा ।।


जय जवान - जय किसान

हा आमुचा हो नारा

सदैव उंच फडकत राही

माझा तिरंगा प्यारा ।।


कुणी हिमालय चढून जातो

कुणी कुठे विजेता होतो

तिथे तिथे हा डौलत राही

माझा तिरंगा प्यारा। ।।


माझ्या देशाची किर्ती महान

नका समजू कुणी लहान

साऱ्या दुनियेत फडकत राही

माझा तिरंगा प्यारा ।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational