STORYMIRROR

Ramkrishna Nagargoje

Inspirational Others

4  

Ramkrishna Nagargoje

Inspirational Others

माझा महाराष्ट्र

माझा महाराष्ट्र

1 min
176

आम्ही बोलतो भाषा मराठी

सह्याद्रीच्या शिखरावरती,

महाबळेश्वर, हवा, थंड किती,

राज्य मराठी, राजा शिवछत्रपती


कोकण सारा, समुद्र किनारपट्टी,

लाट ऊसळते येथे सारी,

भात लवलवतो, तुरे डौलती,

येथे सारी भातशेती,

हापूस आंबा, आणि पहा सारी

कोकण किनारपट्टी,


ही अरबी समुद्राची, महती,

चमचम चमके येथे मुंबई,

भारताची शान किती,

ही राजधानी महाराष्ट्राची,


मराठवाडा वेरुळ अजिंठा,

लेणी कोरीव किती,

घृष्णेश्वर, औंढा नागनाथ,

ही वैद्यनाथाची परळी


गहू बाजरी, शाळू, ज्वारी,

कापूस सारा,येथे पिकतो,

मूग आणि मटकी

ही मराठवाड्याची शेती


उंच उंच वृक्ष साग पहा किती,

विदर्भात जंगल सारे,

आणि खनिजे पहा,

नागपूरची संत्री


खानदेश हा, बागा केळीच्या किती,

मुक्ताईनगर येथे,

भगिनी ज्ञानेश्वराची,


इंद्रायणी तीरी पहा,

आंळदी, ज्ञानेश्वराची,

देहूने अंभग दिला,

गाथा तुकारामांची


नद्या वाहती, कृष्णा-कोयना,

गोदावरी, पैठणीची,

चंद्रभागेच्या तीरी, विठ्ठल उभा,

ही आषाढी, देवाची

ही भू वारकऱ्यांची


हिरवीगार शेती ऊसाची,

आणिक पिके किती,

येथे झाले, शिवछत्रपती,

राजे शाहू, महात्मा फूले,

आणि टिळक, आगरकर,

आंबेडकर, हे सुधारक,

आणि नेते किती,

ही भू शिवछत्रपतींची


किल्ल्याकिल्ल्यात महाराष्ट्र उभा,

आम्ही मावळे बोलतो, मराठी,

शेतकऱ्यांचा महाराष्ट्र हा,

शेतकऱ्यांचा आसूड हा,

महात्मा फुलेंनी दिला हाती


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational