STORYMIRROR

Pavan Pawar

Abstract Romance Tragedy

2  

Pavan Pawar

Abstract Romance Tragedy

माझा जीव पीसा झाला

माझा जीव पीसा झाला

1 min
69

दिवसाची रात्र झाली न कळे मला,

जीवनाची साक्ष साली न कळे मला.

आयुष्याचा आधार मिळाला तुझ्या रूपाने,

हातातील नात्याला कुठली साथ न कळे मला.

पाषाण जिवनाला प्रेमाचा पाझर कसा फुटला. आयुष्यात तुझ्या आगमनाने माझा जीव पिसा झाला. 


आनंदाच्या क्षणात सर्व होते माझ्यासोबत,

दु:खात साथ मिळाली होती सर्वाची. 

सुख, दुःख वाटायला तुझी हाक मिळाली, 

या घट्ट नात्यातील भावना न कळे मला.

भावनेत तुझ्या आगमनाने माझा जिव पिसा झाला.


घरात संबंध प्रेमाने जपले जातात, 

भांड्याचा आबाज शब्दाने मिटले जातात.

वेगळा पाहूनचार होणारे सदस्य, 

आज एकाच ठिकाणी जेवतात.

झालेल्या परिवर्तनाचे बिज न कळे मला. 

घरातिल तुझ्या आगमनाने माझा जिव पिसा झाला. 


राहण्याची शुद्ध नव्हती व्यवस्थीत मला.

जिवनाचा आशय कामात शोधायचो. 

कपड्याला ठीगळाची आशा असते का?

आंधळ्याला काजळाची शोभा न कळे मला,

जीवनात तुझ्या आगमनाने माझा जीव पिसा झाला.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract