माझा दहावीचा वर्ग
माझा दहावीचा वर्ग
वर्ग सुरू होण्याआधी आमची वेगळीच मजा असायची,
टीचर चे काम करण्याऐवजी मी पूर्ण शाळा फिरायची
शिक्षक भेटले पुढे की मी काम सांगितलं म्हणायची
हातात हजेरी घेऊन मी माझा दबदबाच दाखवायची...
थोडे विषय निघाले की, मधली सुट्टी असायची,
स्वतःचा डबा उघडून मी मैत्रिणीच्या डब्यात बघायची
खेळण्याची वेळ आली की भावांमागे फिरायची,
भोवरा-भोवरा करता करता पूर्ण वर्गाचे लक्ष वेधायची.
सर्वात जास्त मजा म्हटलं तर अखेरीच्या तासाला असायची,
शिक्षक नसेल वर्गात तर वेगळीच पंगत बसायची
भावांची बॅग घेऊन मुलींच्या बाजूला बसायची,
मागू कसे मानून भाऊ नेहमीं लाजत बसायचे.
अखेर सुट्टी झाली म्हणून भाऊ बॅग घेऊन पळायचे,
शिक्षक भेटता दारातच परत वर्गात येऊन बसायचे
त्याची ही गंमत बघून मी पोट धरून हसायची,
आज आठवतात ते दिवस की अशी कशी मी असायची .
सायकलचा वेग सांभाळत, गोष्टींचा नाद असायचा ,
मित्र मैत्रिणीशी गोष्टी करत प्रवास आमचा रचायचा,
घर कधी आले ते न आम्हाला कळायचे,
इथे दिवस संपला की आणखी एक नवीन दिवस घडायचे.
