STORYMIRROR

Shital Yadav

Inspirational

2  

Shital Yadav

Inspirational

माझा भारत

माझा भारत

1 min
14.9K


समृद्ध, संपन्न, सुंदर भारतभूमी

अंतरंगी जपावा हा अखंड वारसा

याच मातीतून जन्मले वीर सुपुत्र

झळाळे जगी जणू बिलोरी आरसा


इथे विभिन्न भाषा अनेकविध बोली

धर्म पंथ जाती एकोप्याने दिसती

सर्वधर्म समभावाचे आलय आगळे

इथे राम अन् रहीम मनी इथेच वसती


बाह्यांगी जरी दिसे भिन्नता तरी

मानवता, राष्ट्रभक्ती प्रेम अंतरंगी

जयघोष भारतवर्षाचे करताना

एकता समतेचा सूर येई अभंगी


स्वातंत्र्यवीर महान, महात्मा उपजले

भारताच्या या पावन धरतीतून

बहुरंगी विचारधारेचे अमर राष्ट्रगीत

स्त्रवले गुरु टागोरांच्या लेखणीतून


तिरंगा स्वाभिमानाचा, वीरतेचा

फडकत राहील संपूर्ण विश्वात

बहुरंगी अतूल्य लोकसंस्कृती

देशभक्तीचे रुधिर वाहे नसानसात


मशाल एकतेची धगधगती राहो

सुगंध देशाभिमानाचा दरवळे

मंदिरी 'कुराण' मशीदीत 'गीता'

आज सकल मानवजातीला कळे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational