STORYMIRROR

Sunita Ghule

Inspirational

4.1  

Sunita Ghule

Inspirational

माझा बाप

माझा बाप

1 min
836


अष्टाक्षरी


माझा बाप


शेतकरी माझा बाप

हिरवाई पेरतोया

देवराया कृपेवरी

भूक जगी तारतोया।


सर्जा राजाच्या जोडीला

बाप शेतात कष्टतो

नाही पोटभर घास

पोट जगाचे भरितो।


पीक पाण्यात बुडते

कधी दुष्काळ छळते

दाटे दुःख अंतरात

सुख डोयात सुकते।


घालमेल लेकरांची

पोट खपाटीला जाते

घोट पाण्याचा पाजून

माय सावरून घेते।


ओढी तिफनीनं रेघा

खाली बियाणं पडते

अनवाणी पावलांनी

माय वखार धरिते।


मले दिसते हिर्वय

स्वप्न बापाचे साकार

लेक शिकतो शाळेत

येवो जीवना आकार।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational