STORYMIRROR

Shila Ambhure

Inspirational

3  

Shila Ambhure

Inspirational

लवकर या

लवकर या

1 min
29.2K


गणपती बाप्पा

आवडे तू मला

मोदक नि लाडू

भरविले तुला


स्वागताला तुझ्या

ढोल, ताशा, बाजा

शोभतोस तूच

देवांचा रे राजा


दहा दिवस तू

राहिलास घरी.

पाहुणचारही

केला बघ भारी.


भाद्रपदाची ती

चतुर्दशी आली

निघायची तुला

घाई फार झाली.


निरोप देतो मी

तुम्हास मोरया.

पुढल्याच वर्षी

लवकर हो या.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational