STORYMIRROR

Sunita Anabhule

Inspirational Others

3  

Sunita Anabhule

Inspirational Others

लॉक डाऊन

लॉक डाऊन

1 min
12.1K

लॉकडाऊन, लॉकडाऊन,

म्हणजे असते तरी काय राव,

एकटं एकटं जगण्याला नसतो काही भाव,

एकांत भोगायचा लोकांत सोडून,

हे आपल्याला दिसते का शोभून।।


टवाळक्या, कुचाळक्या मैत्री व गप्पा,

उठसूट फिरण्यात असते किती मज्जा,

सतत नजरबंदीत राहून थकलो बाप्पा,

एकटे एकटे जगण्याची नको ही सजा।।

प्रेमाने गच्च मिठी मारायची नाही,

हातात हात घालून फिरायचे नाही,

एकमेकांना स्पर्शसुद्धा करायचा नाही,

तीन फूट अंतर आता प्रत्येकात राही।।

आता सकाळी उठायची नसते घाई,

सतत भुणभुण करायला नसते आई,

व्यायामाचे टुमणे बाबा लावत नाही,

कोणीच कोणाला काहीही बोलत नाही।।

जणू सारे जगच झालेय lock, (फ्रीज) बंदिवान

बर्फासारखी माणसे गेलीत थिजून,

कोरोनाच्या भितीने जग गेलं धास्तावून,

क्रूर काळाच्या या मृत्यूतांडवानं।।

थोडे दिवस नातेवाईकांना लांबच ठेवू या,

स्वतःलाच घरातल्या घरातच बंद करु या,

प्रत्यक्ष गळाभेटीचा आनंद नको ना लुटू या,

घरातल्या लोकांशी मोकळा संवाद करु या।।

लॉकडाऊन करून कोरोनाला हरवू या,

लवकरात लवकर या महामारीला रोखू या,

सरकार, डॉक्टर, पोलिसांना सहकार्य करु या,

भारताला कोरोनाच्या संकटातून वाचवू या।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational