STORYMIRROR

Sarika Jinturkar

Inspirational

3  

Sarika Jinturkar

Inspirational

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक

1 min
677

महाराष्ट्राच्या मातीसाठी पार्वतीबाईच्या पोटी 

जन्मलेला वीर बालक 

म्हणजे टिळक 

अन्याय अत्याचाराविरुद्ध सर्वसामान्याच्या मनामध्ये  

पेटलेली आग म्हणजे टिळक  


"स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच" अशी सिंहगर्जना करणारी व्यक्ती म्हणजे टिळक  

सर्वसामान्यांसाठी बुलंद आवाज 

अत्याचार सहन करणाऱ्या रयतेने 

स्वातंत्र्यलढ्यासाठी दिलेली साद म्हणजे टिळक  


 शिक्षक, सामाजिक कार्यकर्ता, प्रभावी नेता,प्रभावी संपादक म्हणजे टिळक 

सार्वजनिक उत्सवातून सामाजिक एकात्मतेची जाणीव करून देणारी अभिव्यक्ती म्हणजे टिळक  

स्वातंत्र्यसेनानी, राजकारणी, राष्ट्रवादाचा पुरस्कार 

करणारे विलक्षण प्रभावी संघटक म्हणजे टिळक

लोकतंत्र शिकवणारे, बालविवाह विरोधक,समाज प्रबोधक,

खगोल आणि गणिताचे ज्ञानी म्हणजे टिळक  


स्वदेशीचा आग्रह आणि परदेशी कपड्यांची होळी  

वकृत्व धारदार आणि समृद्ध लेखनीमुळे मिळालेली "लोकमान्य उपाधी" म्हणजे टिळक  

आगरकरांचा सोबत 'केसरी 

आणि मराठा' सारख्या वृत्तपत्रांची सुरुवात करणारे

 'डेक्कन एज्युकेशन सोसायटीची व फर्ग्युसन महाविद्यालयची' स्थापना करणारे 

 प्राच्यविद्या पंडित म्हणजे टिळक  

मंडालेच्या तुरुंगातही

 'गीता रहस्य ग्रंथ'

 लिहिणारे कणखर मराठी बाणा म्हणजे टिळक  


भारतीय असंतोषाचे जनक समजल्या जाणारे

 भगवतगीतेचे आधुनिक भाष्यकार म्हणजे टिळक 

 जहाल नेतृत्व, तेजस्वी वकृत्व  

अन्याया विरुद्ध जळणारी लखलखती मशाल 

म्हणजे टिळक

 देशासाठी तुरूंगवास भोगला 

केले ज्यांनी समर्पण 

अशा थोर व्यक्तीमहत्वास माझे त्रिवार नमन


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational