STORYMIRROR

Pandit Warade

Inspirational Others

4  

Pandit Warade

Inspirational Others

लोक वेडे

लोक वेडे

1 min
249

वृत्त:- आनंदकंद

लगावली:- गागालगा, लगागा, गागालगा, लगागा

(सूट घेऊन)


आयुष्य वेचताना छळतात लोक वेडे

मी चाललो स्मशानी रडतात लोक वेडे


जाता सवे कुणीही काहीच नेत नाही

मागे तरी धनाच्या पळतात लोक वेडे


पाऊस खूप झाला सारे सडून गेले

मातीत त्या तरीही मळतात लोक वेडे


हातात हात माझ्या मी घेतला सखीचा

ठाऊक ना कशाला जळतात लोक वेडे


बेधुंद या मनाला वेळीच आवरावे

बा पंडिता उगाचच नडतात लोक वेडे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational