लोहाराचं पोर
लोहाराचं पोर
काय चूक होती
लव्हाराच्या पोराची
उरी घाव होते संकटांचे अन
निखारे नशिबी दारिद्र्याची
लहान वयातच खांद्यावर
जबाबदारी पडली
खूप व्हती इच्छा शिकायची
पण जबाबदारीमूळ शाळा सुटली
बाप बोलला काय? मिळणार तुला
ही बुकं शिकून
पैक भरायची ऐपत नाही आपली
त्या परिस घी लोहारकी शिकून
काळीज फाकून गेलं बापाचं
घनासारखं घावाचं शब्द ऐकून
वाटल खरच बोलत आहे बाप माझा
आजची परिस्थिती पाहून
अंधारलेल्या होत्या वाटा साऱ्या
आता कोणताच पर्याय नव्हता
भीक माघून लाचार होण्यापेक्षा
स्वाभिमानाने जगण्याचा एवढाच मार्ग होता
संपली होती लव्हाराच्या पोराची
शिकून मोठं होण्याची कहाणी
नशिबात होतं आयुष्यभर घणाचे घाव अन्
लालबुंद पोलादाला शांत करत चुरचुरणार पाणी
