Lockdown संपल्यावर
Lockdown संपल्यावर


Lockdown संपल्यावर मी बरेच काही करणार,
दोन महिने work from home केलेला मी आधी ऑफिस गाठणार
Lockdown संपल्यावर मी बरेच काही करणार,
रोज zoom वर आम्ही भेटणारे अगदी चक्क समोरासमोर बसून मनसोक्त गप्पा मारणार
Lockdown संपल्यावर मी बरेच काही करणार,
लंचब्रेकमध्ये डब्याची देवाणघेवाण करून मस्त ताव मारणार
Lockdown संपल्यावर मी बरेच काही करणार,
अहो दोन महिने घरात कोंडून ठेवलेल्या मनाची झालेली घुसमट मित्रांसमोर उकलणार
Lockdown संपल्यावर मी बरेच काही करणार,
हक्काच्या मित्राबरोबर पूर्ण दिवस असणार
अगदी यापुढे अशी कोणतीही संकटे आली तरीही आपल्या एकजूटीने
त्यावर मात करणार
हातात हात घेऊन मैत्रीची वेल वृद्धींगत करणार, विश्वासाने वचन मागणार नि देणार
सगळे कोरोनाच्या नियमांचे पालन करणार
पहिले कलुषित मनाला सॅनिटाईझ करणार, वाईट प्रवृत्ती सोशल डिस्टन्सिंग पाळणार,
चांगले तेवढेच वेचणार, अपशब्द रोखण्यासाठी तोंडावर मास्क बांधणार
आपणही जगायचं व इतरांना जगू द्यायचं हे ब्रीदवाक्य मनात रुजवणार..
निश्चयाने वचन देणार lockdown संपल्यावर माणूस म्हणून पहिले जगायला शिकणार