लक्ष्मणरेषा
लक्ष्मणरेषा
लक्ष्मणरेषा सीतेपुढे
गेली चुकून ओलांडली
रामायण घडले त्याने
युद्धाची नांदी ठरली
तुझ्यापुढेही कितीकशा
काढल्यात लक्ष्मणरेषा
पुरुषजातीने पुसटशा
दृश्य किंवा अदृशश्या
शिक्षणपूर्तीच्या आधीच
संमतीविना मंडपात
छोट्या निरागस वयात
प्रपंचाचा व्याप गळ्यात
मुलाच्या हट्टापायी तिने
किती वेळा चान्स घ्यायचा?
समानतेचा अर्थ ह्यांना
कुणी समजवायचा?
घर-नोकरी सांभाळता
तारेवरची कसरत
नव-याची दहशत
वर गाजवी हुकमत
रुढी-परंपरांच्या शृंखला
त्याच जुन्या रिती भाती
धीटपणाने सांग सखे
दमतेस तू ह्यात किती!!
अशा दृश्यादृश्य रेषांना
आता पुसून टाकायचे
तुझे म्हणणे आता सखे
ठामपणाने सांगायचे
