लिहुया म्हणते..
लिहुया म्हणते..
लिहू या म्हणते थोडं आज,
मनांत एक गुपित दडलंय.
काट्यांनी जपावे गुलाबाला जसे,
आजवर मी त्यांना जपलंय.
लिहू या म्हणते थोडं आज,
मनांत एक गुपित दडलंय.
प्रेम नावाचं ते मर्मबंध,
मला हल्ली चं उमगलयं.
लिहू या म्हणते थोडं आज,
मनांत एक गुपित दडलंय.
आयुष्याचं सारंच मुळी,
या नात्यांमध्ये गुंफलंय..!!

