लेकीचे अस्वस्थ मन
लेकीचे अस्वस्थ मन
गणगोत सार माघारी गेलं
आठवण येते माहेरचे दार
कस सांगू या जगा ....
नको आहे हे सासर......
हवे आहे ते मायेचे माहेर घर......
का म्हणून घर मुलीनेच सोडावं....
कधी तरी घर मुलाने ही सोडून बघावं....
न सोडता घर दोघांनी....
दोन्ही परिवार एकत्र करून बघावं.....
म्हणत नहीं मी वाईट आहे सासर....
पण का नेहमी मुलीनेच सोडावं घर.....
आई वडिलांचे प्रेम दुरूनच उब देते.....
आठवण येता मन गहिवरून जाते.....
कितीही प्रेम सासरी मिळाले तरी पण.....
माहेरच्या प्रेमाची सर सासरी नहीं केले.....
काय झाली हि माझी गथा ....
कस म्हणून मी आहे कोणाची....
माहेरची की सासरची प्रथा......

