STORYMIRROR

Dhananjay Deshmukh

Inspirational Others

3  

Dhananjay Deshmukh

Inspirational Others

लेखणी...

लेखणी...

1 min
271

अलवार तो स्पर्श

शब्दातून करी लेखणी

बंध तिचे माझे हे

गुलाबी पाकळी देखणी...


राहण्यास खंबीर

मनी साथ तिची लाभते

प्रेमळ स्पर्श तिचा

गारवा ती मायेचा देते...


छाया शीतल तिची

ऋतू असो तो कोणताही

आनंदाच्या धारेत

सोबती ओसंडून वाही...


जीवनी तिच्याविना

सोबती ना दुसरा कोणी

तिला स्थान श्वासांचे 

ती वाहती रक्तधमनी... 


समजतो मी व्यर्थ 

नाही ती कुणाच्या जीवनी 

कसला नीतिवान 

हाती नसे ज्याच्या लेखणी...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational