STORYMIRROR

Rohit Khamkar

Inspirational

3  

Rohit Khamkar

Inspirational

लेखणी

लेखणी

1 min
946

तू हातात आलीस आणी लिहायला लागलो, 

प्रत्येक गोष्टीला कुतुहलाने पहायला लागलो.


चेष्टा मस्करी, कौतुक कैक टीका केल्या तूझ सोबत, 

शाई विना एकटे पण आता नाही शोभत.


आयुष्यभर छातीवर घेऊन तुला मिरवली, 

खर सांगू शांत राहून कित्येकांची तू जिरवली.


लोकांच मात्र वेगळ होत जे दाखवायचे तेच दिसायचे, 

धाडस लिहिण्याच तूझ होत जे दिसायचे तेच दाखवायचे.


काही कारणास्तव लोक तुला बदलायची, 

तूझच रूप घेऊन तुझी सवत कागदावर नाचायची.


सगळ्यांना वाटायच तेच तूझ्या सोबत असतात तुला चालवतात, 

गंमत वेगळीच होती तूझ्या सानिध्यात सगळे तूझ्या सोबत जगतात.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational